बिहार : ऊस खरेदी दरात १० रुपयांची वाढ : मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

पाटणा : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बिहार सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊस खरेदी दरात प्रती क्विंटल १० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला. या मंत्रिमंडळ बैठकीत ऊस दरासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कॅबिनेटने पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लव कुश इको टुरिझम पार्कचे बांधकाम आणि वाल्मिकीनगरच्या विकासासाठी ५१ कोटी ५४ लाख ७ हजार ९०० रुपये मंजूर केले. शिवाय, मोतिहारी येथील अल्पसंख्याक शाळेसाठी २०७ कोटी रुपये, सिवानमधील अल्पसंख्याक शाळेच्या इमारतीचे बांधकाम, पाटण्यात झेवियर विद्यापीठाची स्थापना, रक्सौल विमानतळाचा विकास आणि दरभंगा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवण्यासाठी २४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here