पाटणा : केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर इथेनॉल उत्पादन क्षेत्रात अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेण्यास बिहारला मदत होईल असे उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. राज्याचे इथेनॉल उत्पादन धोरण २०२१ची सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच बिहार हा देशातील इथेनॉल हब बनेल असे उद्योगमंत्री हुसेन यांनी सांगितले.
केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी सकारात्मक निर्णय दिला आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादन धोरणानंतर देशातील हे असे धोरण ठरविणारे पहिले राज्य आहे.
मंत्री हुसेन म्हणाले, मुख्यमंत्री नीतीन शुमार यांनी पंधरा वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडे यासाठी मंजुरी मागितली होती. मात्र, तत्कालीन युपीए सरकारने यास अनुमती दिली नाही. त्यामुळे बिहार राज्य विकासापासून कोसो दूर राहिले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्यात एक नवे इथेनॉल उत्पादन धोरण सुरू झाले आहे. यातून बिहारमध्ये एक नवी क्रांती निर्माण होईल.
हुसेन म्हणाले, बिहार देशातील इथेनॉल हब बनेल. पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी करून देशातील विदेशी मुद्रा भांडार वाचविण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरेल. राज्यात इथेनॉल उत्पादनासाठीचे युनीट निर्माण करण्यासाठी २० ते ३० प्रस्ताव आतापर्यंत आले आहेत. त्यातून ५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होऊ शकेल. सर्व गुंतवणूक प्रस्तावांना एक खिडकी माध्यमातून मंजुरी दिली जाईल.