पु्र्णिया : बिहारच्या लकांना पूर्वोत्तर भारतातील सर्वात मोठ्या पेप्सी प्लांटनंतर इथेनॉल प्लांटची भेट मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे ३० एप्रिल रोजी या नव्या प्लांटचे उद्घाटन करणार आहे. हा प्लांट औद्योगिक विकासाच्या दिशेने, पुर्णियाला इथेनॉल उद्योगात पुढे आणणारे एक पाऊल आहे. पुर्णियातील धमदाहा विभागातील गणेशपूर परोडामध्ये बिहारमथदील हा पहिला इथेनॉल प्लांट तयार करण्यात आला आहे. यासाठी १०४ कोटी रुपयांचा खर्च आला असून तो इंडियन बायोफ्यूएल्स प्रायव्हेट लिमिटेडने १५ एकर जमिनीवर तयार केला आहे.
याबाबत प्रभातखबरमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हा प्लांट एका दिवसात ६५ हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन करेल. याचा फायदा सीमांचलच्या लोकांना होईल. यातून रोजगार निर्मिती होणार असून बिहारमधील या प्लांटमधून मक्का आणि खराब तांदळापासून इथेनॉलचे उत्पादन होईल. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला याची चाचणी घेण्यात आली. कच्चा माल म्हणून मक्का खरेदी करण्यात आला. त्यातील उर्वरित भाग वापरानंतर पशुंच्या आहारासाठी मिळेल. यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे. जिल्ह्यात मक्का आणि तांदूळ ९० ते ९५ हजार हेक्टरमध्ये लावले जातात. त्यामुळे कच्चा माल सहजपणे उपलब्ध होणार आहे.