बिजनौर : जिल्ह्यात सुरू असलेल्या तिन्ही साखर कारखान्यांचे कामकाज रविवारी रात्री उशीरा बंद झाले. सर्व कारखान्यांनी यावर्षी सर्वात जास्त ऊस गाळप, इथेनॉल आणि साखरेचे उत्पादन केले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात जवळपास २ लाख ५५ हजार एकर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली होती. एकूण नऊ कारखाने या उसाचे गाळप करतात. यावेळी शेतकऱ्यांच्या खोडवा उसाला हवामान बदलाचा फटका बसला. मात्र, लागण उसाचे उत्पादन चांगले मिळाले. त्यामुळे साखर कारखान्यांकडून उशीरापर्यंत गाळप करण्यात आले.
जिल्ह्यात बरकातपूर, बुंदकी, बहादरपूर साखर कारखाने सुरू होते. तिन्ही कारखाने रविवारी रात्री उशीरा बंद झाले. ऊस विभागाच्या म्हणण्यानुसार सर्व कारखान्यांनी १२ कोटी ४३ लाख ४३ हजार क्विंटल उसाचे गाळप केले आहे. गेल्या हंगामात ११ कोटी ५९ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले होते. यंदा कारखान्यांनी ८९ लाख ७१ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. शिवाय १६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन झाल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी दिली.