बिजनौर: ऊस बिले थकविणाऱ्या कारखान्यांविरोधात भाकियूची मोहीम

बिजनौर : भारतीय किसान युनियन अराजकीयने बजाज साखर कारखाना बिलाईविरोधात आंदोलन सुरू केले आहे. संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनेक गावांमध्ये जावून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली. भाकियू प्रदेश उपाध्यक्ष अतुल कुमार यांनी सांगितले की, ऊस दर न देणाऱ्या साखर कारखान्यांना पुढील हंगामात ऊस पुरवा केला जाणार नाही. कुमार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंडाला ऊस खरेदी केंद्र तसेच मोहम्मदपूर मंडावली केद्रांवर तसेच गावात जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला. आणि पुढील रणनीती तयार केली.

अमर उजालामधील वृत्तानुसार, साखर कारखाना वेळेवर ऊस बिल देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील हंगामात त्यांना ऊस पुरवठा न करण्याचे ठरले. थकीत ऊस बिलाबाबत जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी गौरव जंघाला, अंकित नरवाल, आस मोहम्मद, कपिल कुमार, नईम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here