बिजनौर: बिजनौर साखर कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. बिजनौर साखर कारखान्याने ३९ लाख ६५०० क्विंटल ऊसाचे गाळप केले. साखर कारखान्याने ४ लाख ७० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. कारखान्याचा उतारा ११.४६ टक्के राहीला आहे.
बिजनौर साखर कारखान्याचा गळीत हंगाम बुधवारी समाप्त झाला. कारखान्याचे प्रशासन अधिकारी ए. के. सिंह यांनी सांगितले की, कारखान्याने गाळप पूर्ण केले आहे. सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाल्यानंतरच कारखाना बंद करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेक कर्मचारी कामावर येत नव्हते. अनेकजण आजारी होते. त्यामुळे कारखाना प्रशासनाला अडचणींचा समना करावा लागला. शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या ऊस बिलाचे थकीत पैसे दिले जातील.