बिजनौर : ऊस विभाग ग्रामीण भागातील ५१ रस्त्यांची विशेष दुरुस्ती करणार आहे. हे रस्ते सुमारे ८० किलोमीटरचे आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ऊस विभागाने नसिरी गावातील रस्त्यावर विशेष कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस पुरवठा करण्यास कोणताही अडथळा येवू नये यासाठी ऊस विभाग ग्रामीण भागातील ऊस समित्या आणि ऊस परिषदांसाठी साखर कारखान्यांकडून २० टक्के बजेट खर्च केले जाते. इतर खर्च जिल्हा योजना आणि सरकारकडून मिळालेल्या निधीतून केला जातो.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सर्वात खराब रस्त्यांची दुरुस्ती प्राधान्यक्रमाने केली जातील. त्यासाठी सर्वात जुन्या मार्गांची निवड करण्यात येत आहे. ऊस विभागाच्यावतीने त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे. कोरोना काळानंतर गेल्या दोन ते तीन वर्षात रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे खराब रस्त्यांची संख्या अधिक आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विभागाने २९५ रस्त्यांची दुरुस्ती करण्याची यादी लोकनिर्माण विभागाकडे हस्तांतरीत केली आहे. सरकारने जिल्ह्यातील ५१ रस्त्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी खास बजेट जारी केले आहे. यापैकी आठ वर्षापूर्वीच्या रस्त्यांची कामे प्राधान्याने केली जातील, असे अव्वर अभियंता राजेश कुमार यांनी सांगितले.