हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील बजाज ग्रुपच्या बिलाई साखर कारखान्याने साखर उताऱ्याचे आजवरच सगळे उच्चांक मोडून काढले आहेत. साखर कारखान्याने १४.०१ टक्के उतारा दिला आहे. भारतात आजवर कोणत्याही साखर कारखान्यांने एवढा उतारा दिलेला नाही.
या संदर्भात बजाज हिंदुस्तान शुगरचे वरिष्ठ उपाध्यक्ष एस. एम. रजा यांनी ChiniMandi.com ला विशेष मुलाखत दिली. उताऱ्याच्या बातमीला त्यांनी दुजोरा दिला आहे. उसाच्या विविध जातींमुळे साखऱ कारखान्याला त्याचा फायदा झाला, असा दावा रजा यांनी केला आहे.
रजा म्हणाले, साधारणपणे उसाच्या एखाद्या वाणाचे आयुष्य हे २० वर्षे असते. बिलाई कारखाना परिसरातील Cos 767, Cos 8436, Cos 8432 हे वाण खूप जुने झाले होते. त्याऐवजी Co 238, Coj 85 या वाणांची लागवड करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून जुने वाण बदलण्यात येत आहेत. कारखान्याच्या ऊस व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या बरोबरीने हे वाण बदलण्याचे काम केले आणि त्याला यशही आले.’
ते म्हणाले, ‘ऊस व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी या नव्या वाणाविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. ऊस लागवडीची नवी पद्धत त्यांना समजावून सांगितली. तसेच पिकाचा सांभाळ कसा करायचा याचीही माहिती दिली.’ शेतकऱ्यांना उन्हाळ्यातील पिकासाठीही प्रोत्साहन देण्यात आले. जेणेकरून त्यांना एकाचवेळी अनेक पिके घेता येतील. तसेच उसाची परिपक्वताही वाढले, असा रजा यांनी सांगितले.
रजा म्हणाले, ‘उसाच्या वाणावर व्यवस्थित प्रयोग करून मगच त्याची लागवण करण्यात आली. पिकाचा कालावधीही निश्चित करण्यात आला. परिसरात गव्हाच्या लागवडीनंतर ऊस काढण्यात येतो. कारखानान्याच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना लवकर लागवड करण्याचे फायदे सांगितले आणि गव्हाच्या पेरणीपूर्वी ऊस क्षेत्रात उसाची लागवड होईल, याची काळजी घेतली. त्यामुळे उसाला १२ महिन्यांचा कालावधी मिळाला. त्याचा फायदा शेतकरी आणि साखर कारखाने दोघांनाही झाला आहे.’
रजा यांनी या यशाचे श्रेय बिलाई युनिटचे प्रमुख अजय शर्मा यांना दिले.
या यशाला इतर कोणती कारणे फायद्याची ठरली याविषयी अजय शर्मा म्हणाले, ‘आम्ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवली होती. त्यानुसार केवळ गाळपासाठी धडाधड ऊस कापणे आम्ही थांबवले. साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेनुसार आम्ही ऊस तोडीचे नियोजन केले.’ ऊस खरेदी केंद्रांवर त्याचे नियोजन केले. त्याचबरोबर ऊस वाहतूक व्यवस्थाही बदलली. जेणेकरून कारखान्यात ताजा ऊसच येईल, याची काळजी घेतली. ऊस वाहतुकीचे मार्ग बदलून ते जवळचे स्वीकारण्यात आले.’ साखरेच्या उताऱ्यामध्ये वाढ झाल्याने कारखान्याच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
उत्तर प्रदेशात यंदाच्या हंगामात सरासरी ११.४२ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या हंगामात याच काळात १०.८४ टक्के उतारा मिळाला होता. मिळालेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश सलग दुसऱ्यावर्षी साखर उत्पादनात अव्वल राहण्याची शक्यता आहे. ताज्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात आतापर्यंत ९७.५६ लाख टन साखर उत्पादन झाले असून, ११७ साखर कारखाने सुरू आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात १०५.४९ लाख टन साखर उत्पादन झाले असून, केवळ ३७ साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त साखर उत्पादन होणार आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp
Amaizing recovery of bilai mill…
It is too much interesting thing for indian sugar industry , factory as well farmer ..