बिजनौर : बजाज ग्रुपच्या बिलाई साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामात पुरवठा केलेल्या उसापोटी शंभर टक्के पैसे अदा केले आहेत.
लाइव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, बिलाई साखर कारखान्याने गुरुवारी १५ कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. त्यामुळे कारखान्याने गेल्यावेळच्या गळीत हंगामातील शंभर टक्के ऊस थकबाकी अदा केली आहे. सध्याच्या गळीत हंगामातही साखर कारखान्याकडून दोन कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत.