गोरखपूर : ऊस शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना कुशीनगरमधील नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. सलग तिसऱ्या वर्षी उसाचे क्षेत्रफळ घटले आहे. तर गेल्या काही दिवसांतील संततधार पावसाने जिल्ह्यात सुमारे ५६७ कोटी रुपयांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.
उत्तर प्रदेश ऊस उत्पादक शेतकरी संस्थेच्या पिपराईच गोरखपूर प्रशिक्षण केंद्राचे सहायक संचालक ओ. पी. गुप्ता यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहिली तर कुशीनगरमध्ये २०१९-२० मध्ये १ लाख ७२४ हेक्टर ऊस पिक होते. तर २०२०-२१ मध्ये ते ९१ हजार ११५ हेक्टरवर आले. यंदा फक्त ८७ हजार ५१९ हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. सातत्याने ऊस पिकाचे लागवड क्षेत्र घटत आहे. ऊस पिकवणारे शतकरी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात आहेत. जिल्ह्यात १५२० गावांतील दोन लाख २२ हजार शेतकरी ऊस पिकवतात. उसावर सातत्याने येणाऱ्या अडचणींमुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत. शेतकऱ्यांनी नेहमीच्या प्रजातीच्या उसाची लागवड करण्याची गरज आहे असा सल्ला गुप्ता यांनी दिला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link