नैरोबी: केनियामध्ये साखर तस्करीचा एका मोठा प्रकार उघडकीस आला आहे. केनिया महसूल प्राधिकरणाच्या (केआरए) अधिकाऱ्यांनी तुर्काना काउंटीमधील लोधवार येथे तस्करी करून आणलेली साखर जप्त केली आहे. ही साखर युगांडामधून आयात करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या साखरेचे बाजार मूल्य सुमारे Sh40 मिलियन इतकी आहे.
स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार केनिया महसूल प्राधिकरणाच्या रिफ्ट व्हॅलीचे विभागीय अधिकारी निकोलस किनोटी यांच्या नेतृत्वाखालील गुप्तचर विभागाने हे ट्रक ताब्यात घेतले आहेत. या तस्करांचे राजकीय लागेबांधे असल्याची माहितीही समोर आली आहे.
संबंधीत राजकीय नेत्याचे तीन स्टोअर्स आहेत. त्यामध्ये सुमारे ८०० पोती साखर सापडली आहे.
प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीत ही तस्कर केलेली साखर सापडली, त्याचे मालक तुर्काना उत्तरचे संसद सदस्य क्रिस्तोफर डॉय आहेत. लोधवार शहरातील १५ व्यापाऱ्यांची ही साखर आहे.
तर वाहतूकदार आब्दी हकीम हा शहरातील प्रमुख साखर पुरवठादार आहे.