कोल्हापूर : हमीदवाडा (ता. कागल) येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात दि. १६ दि. ३१ डिसेंबर २०२३ अखेर गळीतास आलेल्या उसास प्रतिटन ३१५० रुपयांप्रमाणे अखेरची ६७२२९.१८३ मे. टन उसाच्या बिलापोटी १४ कोटी ६१ लाख ७९ हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती चेअरमन, खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
या हंगामात २५ जानेवारीअखेर २,८४, ५२० मे. टन उसाचे गाळप होऊन ३ लाख १९ हजार ३५० पोत्यांचे उत्पादन झाले आहे. चालू वर्षी ५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजीराव इंगळे, संचालक प्रकाश पाटील, विश्वास कुराडे, आनंदराव फराकटे, कैलाससिंह जाधव, कृष्णा शिंदे, महेश घाटगे, संचालक नंदकुमार घोरपडे, भगवान पाटील, विनायक तुकान, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील उपस्थित होते.