सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रती टन २,७०१ रुपये यानुसार १५ जानेवारीपर्यंतची बिले बँक खात्यावर जमा केली आहेत. कारखान्याने आजअखेर एकूण ३, ४६, ४६४ मे. टन गाळप केले असून एकूण ३,४९,३८० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. चालू हंगामात सरासरी साखर उतारा १०.१४ मिळाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.
चेअरमन शिवानंद पाटील यांनी सांगितले की, चालू गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पावसाअभावी वाढ न झालेले खराब प्लॉट शिल्लक असून बरेच प्लाट जळीत झाल्यामुळे साखर उतारा कमी होत आहे. तरीही शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगार पगार, तोडणी, वाहतूक ठेकेदारांची बिले वेळेवर देण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे. कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप केल्याशिवाय हंगाम बंद करणार नाही. यावेळी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय उपस्थित होते.