Binny New Re Energy ने धान्यावर आधारित डिस्टिलरी उभारण्याची योजना तयार केली आहे. या प्लांटमधून तामिळनाडूतील तुतीकोरिन जिल्ह्यातील सिंगथाकुरिची गावात १९५ केएलपीडी क्षमतेसह इथेनॉल उत्पादन केले जाईल.
हे प्रस्तावित युनिट ४५.४६ एकर जमिनीवर उभारले जाईल. आणि यामध्ये ५ मेगावॅट सह वीज उत्पादन प्लांटचाही समावेश असेल.
याबाबत, प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, Binny New Re Energy ला आपल्या योजनेसाठी पर्यावरण मंजुरीची (ईसी) प्रतीक्षा आहे.
कंपनीला अशी अपेक्षा आहे की, नोव्हेंबर २०२३ पर्यंत या योजनेवर काम सुरू होईल. आणि एप्रिल २०२५ पर्यंत या युनिटच्या उभारणीचे काम पूर्ण केले जाईल.