स्वच्छ ऊर्जेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बायो-इथेनॉलला प्रोत्साहन

नवी दिल्ली:  भारत आपले स्वच्छ ऊर्जेचे लक्ष्य वेगाने पूर्ण करण्यासाठी, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेडसह सहकार क्षेत्रांतर्गत देशभरात अनेक बायो-इथेनॉल प्लांट उभारणार आहे. इथेनॉलचे उत्पादन येत्या काही दिवसांत देशाच्या पेट्रोलियम क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण बदल घडवून आणेल आणि परकीय चलनाच्या साठ्यात सुमारे १ लाख कोटी रुपयांची बचत करेल, असे सहकार मंत्रालयाने सांगितले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सप्टेंबरमध्ये क्रुभको हझीराच्या बायो-इथेनॉल प्रकल्पाची पायाभरणी केली होती. हा प्लांट मक्याचा वापर करेल आणि हा प्रकल्प  पशुखाद्य, मत्स्यपालन आणि कुक्कुटपालनासाठी कच्चा माल देखील पुरवेल. कृभकोचा हा जैव-इथेनॉल प्रकल्प म्हणजे सहकारी क्षेत्र, पर्यावरण सुधारणा, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, भारताचा परकीय चलन साठा वाढवणे आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या आव्हानांचा सामना या दिशेने एक मोठी झेप आहे. भारताने निर्धारित वेळेच्याआधीच १० टक्के इथेनॉलचे लक्ष्य गाठले आहे. आणि आता २०३० पर्यंतचे २० टक्के इथेनॉलचे लक्ष्य २०२५ पर्यंत वाढविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here