श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना व देश पातळीवर साखर उद्योगाच्या विकासाकरिता कार्यरत असणारी संस्था, शुगर टेक्नोलॉजीस्ट असोशिएसन ऑफ इंडिया (STAI) नवी दिल्ली यांचे मार्फत संयुक्तपणे “कंडेन्सेट ट्रीटमेंट” या विषयावर दि.२२ जानेवारी २०२० रोजी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.
कारखान्याचे अध्यक्ष, श्री. पांडुरंग राऊत, स्टाईचे अध्यक्ष, श्री. संजय अवस्थी, स्टाईचे उपाध्यक्ष, श्री. अनुप केशरवाणी, व श्री. पी.के. बेलसरे तसेच कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डी.एम. रासकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कारखान्याचे अध्यक्ष, श्री. पांडुरंग राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, या ठिकाणी “कंडेन्सेट ट्रीटमेंट” या महत्वपुर्ण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याबद्दल स्टाई या संस्थेचे आभार व्यक्त केले. गेल्या पंधरा वर्षापूर्वी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याची सुरुवात झाली. सुरुवातीस कारखाना १००० मे. टन प्रती दिन क्षमतेचा होता. वेळोवेळी योग्य निर्णय घेत आम्ही आज रोजी कारखाना ५००० मे. टन प्रति दिन, १० मे.व्ँट पॉवर प्रोजेक्ट, ३०००० लिटर प्रती दिन डीस्टीलरी क्षमता आहे व एका अर्थाने कारखान्याचे रुपांतर “शुगर कॉम्प्लेक्स” मध्ये झालेले आहे. तसेच भविष्यात कार्बनडाय ऑक्साईड व बायोगॅस बोटलिंग प्लांटची उभारणी करणार असलेचे सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय साखर उद्योगाची विशिष्टता टिकवून ठेवणे, साखर उद्योगास स्थैर्य प्राप्त होणे करीता तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापुर्ण साखरेचे व इतर उपपदार्थांचे उत्पादन करणे याकरिता आपण सर्वांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. कारखाना नेहमीच नवनवीन टेक्नोलॉजीचा अवलंब करीत आहे. “कंडेन्सेट ट्रीटमेंट” प्लांट आमच्या कारखान्यामध्ये असल्याने स्टाईव्दारा या सेमीनार करता आमच्या कारखान्याची निवड केली आहे. सदर कार्यशाळेकरीता स्टाईचे अध्यक्ष, श्री. संजय अवस्थी, स्टाईचे उपाध्यक्ष, श्री. अनुप केशरवानी व श्री. पी. के. बेलसर आवर्जुन उपस्थित राहिले आहेत त्यांचे कारखान्याच्या वतीने आभार व्यक्त केले.
स्टाईचे अध्यक्ष श्री. संजय अवस्थी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की, साखर उद्योगास आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे याकरीता स्टाई नेहमीच कटीबद्ध आहे. नवनवीन टेक्नोलॉजी साखर उद्योगास माहित व्हाव्यात, नवनवीन टेक्नोलॉजी अवलंब होणेकरीता अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. अल्पावधीत श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे रुपांतर “शुगर कॉम्प्लेक्स” मध्ये झाले याचे संपुर्ण श्रेय्य कारखान्याचे अध्यक्ष, श्री. पांडुरंग राऊत व सर्व संचालक यांना जाते. सदरच्या कार्यशाळेचे आयोजन इतक्या उत्कृष्ट प्रकारे केले त्याबद्दल कारखान्याचे आभार व्यक्त करण्यात आले.
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. डी.एम. रासकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी व स्टाईचे कौन्सिल मेंबर यांचे स्वागत केले. स्टाई मार्फत संशोधन व तपासणी टीम तयार करणेत आलेली असून त्यामध्ये एकूण ५ विषय निवडले गेले आहेत. त्यामधील एक विषय म्हणजे “एन्झाईमची ट्रीटमेंट व एन्झाईमचा वापर करून पाण्याचा पुनर्वापर”. पाण्याच्या पुनर्वापरामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना एक अग्रेसरपणे कार्यरत असल्याने सदरची कार्यशाळेकरीता कारखान्याची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेच्या निमित्ताने पाणी हा विषय एका वेगळ्याप्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. डीस्टीलरी उत्पादनाच्या प्रकियेत मुख्यत्वेकरून पाणी हा अत्यंत महत्वाचा घटक असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. डीस्टीलरी उत्पादन घेताना, उत्पादन घेतलेनंतर शून्य प्रदुषणाच्या दृष्टीने वेस्टेजवर प्रक्रियाव्दारे त्यामधील पाणी संकलित करून त्याचा पुनर्वापर कसा करता येऊ शकतो व त्याकरीता लागणारे केमिकल तसेच योग्य तंत्रज्ञाणाचा वापर याबाबत उपस्थितांना प्रत्यक्ष माहिती घेता आली. डीस्टीलरी मधून निघणाऱ्या स्पेंटओशवर प्रक्रिया करून त्यामधील पाणी वेगळे काढणे व त्याचा पुनर्वापर करणे या करीता खूप पद्धती कार्यरत आहेत परंतु त्यामधील कोणती पद्धत सर्वात जास्त फायदेशीर आहे हे माहीत होणे करिता ही कार्यशाळा महत्वपूर्ण ठरली.
श्रीनाथ म्ह्स्कोबा साखर कारखान्यावर उभारल्या गेलेल्या भारतामधील आगळया वेगळ्या प्रकल्पाची माहिती या कार्यशाळेत देणेत आली तसेच सादर प्रकल्पास प्रत्यक्ष भेटही देणेत आली.
सदारच्या कार्यशाळे करिता बहुसंखेने साखर उद्योग, रिफायनरीज व डिस्टीलरी प्रकल्पानमधील अधिकारी सहभागी झाले होते. कारखान्याचे कार्याध्यक्ष श्री. विकास रसकर, उपाध्यक्ष श्री. बबनराव गायकवाड व संचालक श्री. अनिल भूजबळ, श्री. किसणदादा शिंदे, श्री. योगेश ससाणे तसेच सरव्यवस्थापक श्री. प्रकाश मते, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन स्टाईचे जनरल सेक्रेटरी श्री अमित खट्टर यांनी केले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.