हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्चच्या सहकार्याने कोल्हापुरातील शेतकरी उत्पादक कंपनी नॅचरल फार्म्स (एफपीसी) ने बायोफोर्टिफाइड तांदळाच्या जातीची लागवड करून यश मिळवले आहे.
आपल्या देशात अजून सुद्धा कोट्यवधी जनतेला कुपोषणाचा सामना करावा लागतो आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच या बदलत्या हवामानाचा सामना करून भातपीकाची उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपनी नॅचरल फार्म्स ने “जस्त” या धातु चे प्रमाण असलेल्या बायोफोर्टिफाइड तांदळाच्या जातीची महारष्ट्रात यशस्वीपणे लागवड केली आहे.
दक्षिण भारतातील राज्यांसाठी तयार केलेली ही जात पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर विभागातील चंदगड, कागल आणि राधानगरी या तालुक्यांमध्ये याची लागवड केली गेली होती.या भात पिकाच्या नवीन वाणं लागवडीमुळे भातपीक उत्पादनात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे.
कंपनीचे संचालक श्री. अभिजीत पाटील यांनी राष्ट्रीय भात संशोधन संस्थेसोबत दोन वर्षांतील व्यापक सहकार्यावर समाधान व्यक्त करत ते म्हणाले कि या बायोफोर्टिफाइड तांदळाच्या जातीची लागवड करण्यासाठी राष्ट्रीय भात संशोधन संस्थेने वेळोवेळी मार्गदर्शन केले तसेच ते म्हणले कि या ही नवीन भाताच्या लागवडीमुळे पारंपारिक शेती पद्धतीतच क्रांती घडवून आणली जाणार आहे आणि भात उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ सुद्धा होणार आहे, वाढत्या लोकसंख्येमुळे आणि बादलत्या हवामानसाठी बीओफोर्टिफाइड तंत्रज्ञान संजीवनी म्हणून भविष्यात सर्वांच्या पसंतीस उतरणार आहे.
भारतीय तांदूळ संशोधन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल सांगितले की, आम्ही या नॅचरल फार्म्स (एफपीसी) सोबत गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहोत. बायोफोर्टिफिकेशनच्या या नवीन युगात प्रभावी काम केल्याबद्दल आम्ही या नॅचरल फार्म्स चे व सर्व सभासदांचे अभिनंदन करतो. तसेच यापुढील काळातही आम्ही अशा प्रामाणिक एफपीसी नेहमी मार्गदर्शन करत राहू.
हा बायोफोर्टिफाइड भात प्रगत प्रजनन तंत्राद्वारे विकसित केले गेला आहे, ज्यामध्ये पॉलिश केलेल्या तांदळात 22 पीपीएम आणि पॉलिश न केलेल्या तांदळात 27 पीपीएम “जस्त” या धातूचे प्रमाण आढळून येते. हे भाताचे वाण 135 ते 140 दिवसांत परीपक्व होते, तसेच यास मजबूत देठ, प्रकाशसंश्लेषणासाठी विस्तीर्ण पाने असल्याने भाताच्या उत्पादकता वाढीस याची मदत होते. भात पिकावर पडणाऱ्या पारंपरिक रोगांवरत मात करण्याची जनुकीय सक्षम क्षमता असल्याने हि प्रजात किफायतशीर सुद्धा ठरते.
या बायोफोर्टिफाइड भाता मध्ये सुपरमार्केटमध्ये बाजार मूल्य वाढवण्याची क्षमता असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकतो या पौष्टिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या भाताचे वितरण जर सरकारने रेशन च्या दुकानांमधून व शालेय पोषण आहारात केले तर भारतामध्ये एक सदृढ आणि सशक्त पिढी उभा राहू शकते.