मुंबई : ऐतिहासिकदृष्ट्या निर्यात हा थर्मेक्स प्रमुख भाग होता. गेल्या काही वर्षांत आपला भारतीय व्यवसाय जितका वाढला आहे, तितकी निर्यात वाढलेली नाही. आमच्याकडे निर्यातीसाठी चांगल्या प्रकल्पांच्या योजना पाइपलाइनमध्ये आहेत आणि मला आशा आहे की आगामी काळात निर्यातीत चांगली वाढ होईल, असे थर्मेक्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ आशिष भंडारी यांनी सांगितले.
‘द इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बायोफ्युएल्स सेगमेंटवर बोलताना Thermax चे MD & CEO आशिष भंडारी म्हणाले की, जैवइंधन हा अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणून उदयास आला आहे. इथेनॉल क्षेत्रात आम्ही जे काही करू पाहत आहोत, १जी, २जी इथेनॉल, बायो-सीएनजी आणि हे संपूर्ण क्षेत्र गेल्या काही वर्षांत खूप वेगाने पुढे आले आहे. दोन वर्षांपूर्वी अजिबात चर्चेत नसलेले ऊर्जा क्षेत्र आणि विशेषत: कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून वर्षभरात पुन्हा चर्चेत आले आहेत.