ब्रुसेल्स येथे १८-१९ जून २०२४ रोजी होणार आंतरराष्ट्रीय जैवइंधन परिषद

ब्रुसेल्स : ब्रुसेल्स येथे १८-१९ जून २०२४ रोजी वार्षिक बायोफ्युएल्स आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याच दरम्याने तेथे ‘शाश्वत एव्हिएशन फ्युल्स’ संमेलनही होणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा सुरक्षा यावर या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. जगभरातील विविध कंपन्या आणि सरकारांना त्यांचे पर्यावरणीय लक्ष्य पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी परिषदेत ‘जैव इंधन’ केंद्रस्थानी असणार आहे. युरोपियन संसदेने अलिकडे २०३० पर्यंत ४५ टक्के अक्षय ऊर्जा वापराचे उद्दिष्ट आणि ऊर्जा स्वातंत्र्यासाठी युरोपियन संघाने REPowerEU योजना जाहीर केली आहे. मागील परिषदांमध्ये शेल, बीपी, टोटल, पेट्रोनास, आरईजी शेवरॉन, बोइंग, वर्सालिस आणि नेस्टे या कंपन्यांनी हजेरी लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here