पिलिभीत : भाजप खासदार वरुण गांधी यांनी जिल्हाधिकारी प्रवीण कुमार लक्षकार यांना पत्र लिहून पुरनपूर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस अधिकारी अमित चतुर्वेदी आणि कारखान्याचे ऊस विभागाचे लेखा अधिकारी अनिल शुल्का यांना तत्काळ निलंबीत करण्याची मागणी केली आहे.
याबाबत दि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आपल्या पत्रामध्ये खासदार गांधी यांनी पुरनपूर तहसील सर्कलमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत लिहिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेताना जिल्हा ऊस समितीचे पदाधिकारी जितेंद्र कुमार मिश्रा यांना याबाबत त्वरीत कारवाईचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, मी पूरनपुर सहकारी साखर कारखान्याच्या महासंचालकांना या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले आहे आणि संबंधीत अहवाल सादर करण्यात सांगितेला आहे.
बिकेयू (अराजकीय)चे जिल्हाध्यक्ष मंजित सिंह यांनी १६ जानेवारी रोजी गांधी यांच्यासमोर समस्या मांडली होती. मंजीत सिंह म्हणाले की, सीसीओ आणि लेखा अधिकाऱ्यांनी ऊस खरेदी केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना वजनामध्ये ५ ते ६ टक्के घट दाखविण्यास भाग पाडले आहे.