छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सिद्धेश्वर मुर्डेश्वर शेतकरी विकास पॅनलचे सर्व २१ संचालक विजयी झाले. सलग तिसऱ्यांदा या कारखान्यावर भाजपने एकहाती सत्ता कायम राखली आहे. यापूर्वी भाजपचे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. नऊ जागांसाठी रविवारी निवडणूक झाली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आ. सांडू पा. लोखंडे, माजी जि. प. अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, इद्रिस मुलतानी, अशोक गरूड, मकरंद कोर्डे, सुनिल मिरकर, कमलेश बनकर, कटारिया, किरण पवार, विलास पाटील, मनोज मोरेल्ल, विजय वानखेडे, संजय बडक, किरण शिरसाठ, नंदकुमार श्रीवास्तव आदींनी अभिनंदन केले.
निवडणुकीत आबाराव सोनवणे (७६३), अशोक साबळे (७६१), तारूअप्पा मेटे (७७३), जगन्नाथ दाढे (३०), पुंजाबाई रंगडे (७८७), जिजाबाई दाभाडे (७७४), पदमाबाई जिवरग (७७७), सुनील प्रशाद (८०२), विठ्ठल बकले (७५७) हे विजयी झाले. तर यापूर्वी रामदास हिवाळे, दीपक अपार, आबासाहेब जंजाळ, काकासाहेब फरकाडे, शंकर माने, दिलीप दाणेकर, ज्ञानेश्वर मोठे, किरण पवार, सलीमखाँ मुलतानी, आप्पासाहेब साखरे, सुभाष सपकाळ, प्रभाकर इंगळे हे १२ संचालक बिनविरोध निवडून आले आहे.