लखनौ : शेतकरी संघटना भारतीय किसान युनियनच्या (अराजकीय) एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौत त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. चालू गळीत हंगामासाठी राज्य समर्थन मूल्य (SAP) लवकरात लवकर घोषणा करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. उसाच्या (SAP)मध्ये वाढ करण्याचीही शिष्टमंडळाने मागणी केली. संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना सध्याच्या हंगाम २०२२-२३ मध्ये ऊसाच्या SAP साठी कमीत कमी ४०० रुपये प्रती क्विंटल मिळण्याची गरज आहे. संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांची मागणीही केली आहे.
बिकेयू (अराजकीय) ने शेतकऱ्यांना मोकाट जनावरे आणि पिके नष्ट करणाऱ्या जंगली जवनावरांपासून दिलासा देण्यासाठीच्या उपायांची मागणी केली आहे. शेतकरी रात्री आपल्या पिकांचे रक्षण करतात आणि अनेकदा जनावरांच्या हल्ल्यानंतर त्यांना आपला जीव गमवावा लागतो. याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे. बिकेयूचे उत्तर प्रदेश अध्यक्ष हरनाम सिंह वर्मा यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी या विषयांच्या सर्व पर्यायांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. बिकेयू अराजकीयची स्थापना राजेश सिंह चौहान यांनी यावर्षी मे महिन्यात भारतीय किसान युनियन (बिकेयू) पासून वेगळे झाल्यानंतर केली होती.