हरिद्वार : भारतीय किसान युनियनच्या भानू गटाने थकीत ऊस बिले त्वरीत देण्यात यावीत आणि राज्यातील शेतकऱ्यांना मोफत विज देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या मागण्यांबाबत भाकियूच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी विनय शंकर पांडे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ते के. पी. सिंह यांनी ऊस बिले आणि उत्तर प्रदेशच्या पद्धतीने शेतकऱ्यांना खासगी कुपनलिकांवर मोफत विज देण्याची मागणी केली. ते म्हणाले की, ऊस बिले न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारने लवकरच शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले मिळावीत यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय प्रवक्ते नितीन चौधरी यांनी सांगितले की, जर शेतकऱ्यांचे शोषण बंद झाले नाही आणि मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर भाकियू रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.