हापूड : भारतीय किसान युनियन अराजकीयच्या शिष्टमंडळाने दिनेश खेडा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. थकीत ऊस बिले देण्याची मागणी करत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दिनेश खेडा यांनी सांगितले की, सिंभावली शुगर मिलने शेतकऱ्यांचे ३२५ कोटी रुपये आणि ब्रजनाथपूर साखर कारखान्याने १७५ कोटी रुपये थकवले आहेत. जिल्हा प्रशासनाने मध्यस्ती केल्यानंतर दरमहा ५० कोटी रुपयांची बिले देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात फक्त २५ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीशी सामना करीत आहेत. त्यामुळे तातडीने ऊस बिले मिळावीत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.