सहारनपूर : ऊस थकबाकी आणि विज बिलंबाबत भाकियू तोमर गुट यांनी डीएम यांची भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, कोरोना संकटात शेतकर्यांच्या धैर्याची परीक्षा घेवू नये. जिल्हाध्यक्ष सुखबीर सिंह यांनी सांगितले की, ऊसाची थकबाकी व्याजासहित तात्काळ भागवावी.
लॉकडाउन दरम्यान शेतकरी क्रेडीट कार्ड चे व्याज तथा विजेचे बिल माफ केले जावे. क्रेडिट कार्ड बनवण्यामध्ये शेतकर्यांचे उत्पीडन बंद व्हावे. विजेचे दर शेजारील राज्यांप्रमाणे केले जावेत. तसेच कोरोनाच्या दृष्टीगत शाळांच्या संपूर्ण फी माफ केली जावी. इतकेच नाही, तर उद्योगांमुळे दूषित होणार्या हवा पाणी आणि त्यामुळे होणारे चर्म रोग आणि कॅन्सर साऱखे आजार पसरत आहेत. त्यामुळे उद्योग लोकवस्तीच्या बाहेर असावेत ही मागणीही त्यांनी केली.
यूनियन नेत्यांनी पोलिसांवरही उत्पीडनाचे आरोप केले आणि समस्यांचे निराकरण झाले नाही तर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी सुशील चौधरी, अशोक त्यागी, नवीन त्यागी, रविंद्र चौहान, मयूर गुप्ता, अनिल व श्याम सिेंह राणा, सलीम गौड, नवाब प्रधान आणि रामकुमार आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.