बिनौली : बरनावा गावात भारतीय किसान युनियन अराजकीयच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी थकीत ऊस बिले, मोकाट जनावरांचा त्रास आणि हिंडन नदीच्या प्रदूषणासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. सुभाष शर्मा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेश पाल सिंह होते. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने प्रयत्न करून आणि विविध आश्वासने देवूनही खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडवले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जर लवकरात लवकर पैसे मिळाले नाहीत, तर आंदोलन करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरणार नाही.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बैठकीत थकीत ऊस बिलांसह मोकाट जनावरांच्या त्रासाबद्दल चर्चा करण्यात आली. सरकार या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. हिडन नदीच्या प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्यांची सोडवणूक केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. ओमपाल सिंह, ईश्वर सिंह, धर्मवीर सिरसली, बादल त्यागी, इकराम कुरैशी आदी उपस्थित होते.