पुरकाजी (मुजफ्फरनगर) : ऊस थकबाकीचा मुद्दा आता चांगलाच तापत आहे. यासाठी शेतकरी संघटनेने कारखान्यांविरोधात मोर्चा काढला आहे. भारतीय शेतकरी यूनीयन देखील ऊस शेतकर्यांबरोबर आहे. यूनियनने म्हटले आहे की, जर शेतकर्यांची देणी लवकरात लवकर भागवली गेली नाहीत, धनत्रयोदशीला साखर विक्री करु देणार नाही. जर आमची दिवाळी झाली नाही तर कारखानदारांची दिवाळीही आंम्ही होवू देणार नाही, असा इशारा शेतकरी यूनियनने दिला आहे.
जिल्ह्यातील फलौदा गावात यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी शेतकर्यांना आपापसातील मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र या आणि आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आपल्याला आपली एकी मजबूत करणे आवश्यक आहे. ऊस थकबाकीसाठी आपण अजूनही लढू शकतो आणि न्यायही मिळवू शकतो. या बैठकीमध्ये जनरल सेक्रेटरी राजू अहलावत, पुरकाजी चेअरमन जहीर फारुकी, नवीन राठी, जिल्हाध्यक्ष धीरज लाटियान, मांगेराम त्यागी यांनी संघटनेच्या मजबूतीसाठी अपील केले. ते म्हणाले की, भारतीय शेतकरी यूनियन एक अशी संघटना आहे की, जी शेतकरी, मजूर यांच्यासाठी आवाज उठवत आहे.
कारखानदार आपले काम निभावून नेण्यासाठी शेतकर्यांच्यात फूट पाडण्याच काम करत आहेत. दरम्यान, उत्तम साखर कारखान्याचे जीएम पुष्कर मिश्रा म्हणाले, शेतकर्यांची 52 करोड रुपयाची जी थकबाकी होती, त्यापैकी 22 करोड रुपये भागवले आहेत. दुसर्या टप्प्यात लवकर 11 करोड रुपये भागवले जातील आणि उर्वरीत बाकी देखील लवकरात लवकर भागवण्यात येईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.