जालना : ब्लू सफायर फुड प्रोसेसिंग प्रा. ली. कंडारी कारखान्याकडून गळीत हंगाम २०२३-२४ मधील ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना प्रती टन १०० रुपये दुसरा हप्ता जाहीर करण्यात आला आहे. उसाच्या वाढीव दुसऱ्या हप्त्याची रक्कम सोमवारपासून (दि. २२) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ब्लू सफायर फुड प्रोसेसिंग प्रा. ली. कारखान्याचे डॉ. हिकमत उढाण यांनी ही माहिती दिली आहे. ब्लू सफायरच्यावतीने आतापर्यंत उसाला प्रती टन २,८५१ रुपये एवढी रक्कम अदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. हिकमत उढाण यांनी सांगितले की, कारखान्याने पहिल्याच गळीत हंगामात, २०२२-२३ मध्ये १ लाख २१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला कारखान्याने सुरुवातीला २,७५१ रुपये प्रती मेट्रिक टन असा पहिला हप्ता अदा केला आहे. गेल्या महिनाभरापासून शेती कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांना ऊसासह इतर पिकांना खते, औषध फवारणी करायची आहे. शेतकरी संकटात असल्याने अडचण लक्षात घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी वाढीव दसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला. हा हप्ता १०० रुपये प्रती मे. टन दिला जाईल.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.