पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी ऊसदर दिल्याबद्दल अजितदादा पवार विचार मंचच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वतीने रविराज तावरे (लाखे) यांनी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव व संचालक मंडळाचा सत्कार केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव व सर्व संचालक मंडळाने राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात उच्चांकी असा ३,४११ रुपये इतका ऊसदर देऊन एफआरपीपेक्षा ५६१ रुपये जास्त दिलेले आहेत. या उच्चांकी दराबद्दल अजित दादा पवार विचार मंचच्या माध्यमातून शेतकरी बंधूंच्या वतीने रविराज तावरे (लाखे) यांनी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळाचा सत्कार करून अभिनंदन केले.
सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब तावरे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचा पाठिंबा, शेतकऱ्यांचा विश्वास आणि अधिकारी व कर्मचारी वर्गाचे सहकार्य यामुळे हे शक्य झाले. भविष्यातही शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन संचालक मंडळ कार्यरत राहील, असेही ते म्हणाले. यावेळी रामदास अटोळे, अनिल जगताप, महेश तावरे, दादा थोरात, प्रमोद शिंदे, पी. एस. जाधव, उत्तर देताना वैभव भोसले, मुरली खरात आदी, उपस्थित होते.