बरकतपूर साखर कारखान्यात बॉयलर अग्नि प्रदीपन

नांगलसोती : बरकतपूरच्या उत्तम शुगर मिलमध्ये ऊस गळीत हंगामाच्या प्रारंभासाठी पूजा-अर्चा करून बॉयलर पूजन करण्यात आले. कारखान्याचे सह अध्यक्ष नरपत सिंह यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ करण्यात आला.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बरकतपूरच्या उत्तम शुगर मिलमध्ये पंडित राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा-अर्चा करून बॉयलर पूजन विधी करण्यात आला. यावेळी मुख्य यजमान म्हणून कारखान्याचे सह अध्यक्ष नरपत सिंह होते. अध्यक्ष नरपत सिंह यांनी डिस्टिलरी युनिटचे महाव्यवस्थापक जे. पी. त्रिपाठी, ऊस पुरवठा विभागाचे महाव्यवस्थापक विकास पुंडीर, अभियांत्रिकी विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक अतेंद्र कुमार आदींच्या उपस्थितीत साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये अग्नि प्रज्वलित केला. या कार्यक्रमाला विकास ठाकूर, अर्जुन कौशिक, यशवीर सिंह, अजय शर्मा आदींसह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कारखान्याने ऊस तोडणी, गाळपाबाबतची सर्व तयारी पूर्ण केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here