नरंदे येथील शरद कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा

कोल्हापूर : नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाला. कारखान्याचा २०२३ -२४ सालचा २२ वा गळीत हंगाम लवकरच सुरू होणार असल्याचे आ. पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. कारखान्याचे कर्मचारी संभाजी लोंढे त्यांच्या पत्नी शुभांगी लोंढे व कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील व सुभाषसिंग रजपूत यांच्या हस्ते धार्मिक विधी कार्यक्रम करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी स्व. शामराव पाटील – यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या अग्निप्रदीपन सोहळ्यास संजय पाटील – यड्रावकर, उपाध्यक्ष थबा कांबळे, संचालक आदित्य पाटील – यड्रावकर, अण्णासो सुतार, पोपट भोकरे, शिवगोंडा पाटील, आप्पासो चौगुले, दशरथ पिष्टे, लक्ष्मण चौगुले, संजय बोरगावे, रविकांत कारदगे आदींसह कारखान्यचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here