बिलाई साखर कारखान्यात बॉयलर पूजन समारंभ उत्साहात

हल्दौर : बिलाई साखर कारखान्यामध्ये विधीवत पूजा करून बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात करण्यात आला. कारखाना परिसरात पंडित नरेश चंद्र शास्त्री यांनी विधीवत पूजा अर्चा करून युनिट प्रमुख विकास त्यागी यांच्या हस्ते बॉयलरमध्ये अग्नी प्रज्वलीत केला. युनिट प्रमुखांनी सांगितले की, कारखान्यात प्लांट, उपकरणे, मशीनची ट्रायल घेतली जात आहे. ही चाचणी प्रक्रिया समाप्त झाल्यावर शेतकऱ्यांना इंडेंट जारी केले जाईल. त्यानंतर शेतकरी आपल्या ऊसाची तोडणी करून तो कारखान्याला पुरवठा करू शकतील.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, युनिट प्रमुखांनी सांगितले की, कारखाना सुरू करण्यपासून ते मशीनच्या सफाईपर्यंत सर्व कामांना गती देण्यात आली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात आधी निश्चित केल्यानुसार ९२ ऊस खरेदी केंद्रांपैकी जवळपास ६२ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. अभियांत्रिकी विभागप्रमुख टीकम सिंह, प्रॉडक्शन हेड प्रदीप कुमार सिंगर, कारखाना व्यवस्थापक संजय गोयल, सहायक ऊस व्यवस्थापक सिताब सिंह, सुरक्षा प्रमुख कपिल त्यागी, वित्त विभागप्रमुख संजय गुप्ता, क्वालिटी कंट्रोल हेड विजेंद्र सिंह, आयटी हेड अनिल चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here