साखर कारखान्यामध्ये अधिक़ार्‍यांनी केले बॉयलर पूजन

शहाजहांपूर ,उत्तर प्रदेश: नवीन गाळप हंगामाआधी साखर कारखान्यामध्ये बॉयलर पूजन करण्यात आले. अधिकार्‍यांनी हवन पूजनामध्ये आहुती देवून गाळप हंगाम योग्यपणे संपन्न होण्याची प्रार्थना केली.

ऊसाचे पीक पाहता प्रदेशातील सर्व साखर कारखाने लवकर चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . नवीन ऊस गाळप हंगामाला पाहता गुरुवारी जीएम शेर बहादुर यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बरोबर बॉयलर पूजन केले. चीफ इंजीनियर लक्षेश्‍वर राजू यांनी अधिकार्‍यांसोबत बॉयलर सुरु केला. जीएम शेर बहादुर यांनी सांगितले की, नव्या हंगामात साखर कारखाना चालवण्यासाठी बहुतेक काम पूर्ण केले आहे, आणि जे काम राहिले आहे ते देखील लवकरच पूर्ण होईल. त्यांनी सांगितले की, साखर कारखान्याला याप्रमाणे चालवले जाईल की, साखर रिकव्हरी अधिक येईल. पूजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी जीफ इंजीनियर लक्षेश्‍वर राजू, चीफ केमिस्ट एके श्रीवास्तव, इंजीनियर महेंद्र यादव, मोहित, संजय पाठक, भारत वीर गंगवार, चंद्रभान सिंह, उमेंद्र मिश्रा, विकास बाबू शर्मा आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here