दौराला : आगामी गळीत हंगामाची साखर कारखान्यांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. सकौती येथील आयपीएल साखर कारखान्यात आज, बॉयलर पूजन समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक दीपेंद्र खोखर यांनी दिली. कारखाना या महिन्याच्या अखेरीस आपले गाळप सुरू करणार असल्याचे ऊस विभागाने यापूर्वीच जाहीर केले आहे.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुख्य व्यवस्थापक दीपेंद्र खोखर यांनी सांगितले की, कारखान्यात नव्या गाळप हंगामासाठी देखभाल, दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता रितसर बॉयलर पूजन करून विधीवत अग्नी प्रज्वलीत केला जाईल. त्यांनी सांगितले की, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपापले काम वेळेवर पूर्ण करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. संपूर्ण हंगामात कारखाना व्यवस्थापनात कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही ऊस पुरवठा करण्यात त्रास होणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.