सोलापूर : येथील ‘आष्टी शुगर’ साखर कारखाना सिताराम शुगरने घेतला आहे. कारखान्याने यंदा पाच लाख मे. टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन आष्टी शुगरचे मुख्य प्रवर्तक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले. कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ चा मिल रोलर पूजन कार्यक्रम प्रा. शिवाजीराव काळुंगे व चेअरमन शोभाताई काळुंगे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड़, संचालक सुयोग गायकवाड, दिपाली काळुंगे गायकवाड, स्नेहल काळुंगे- मुद्गल उपस्थित होते.
प्रा. काळुंगे म्हणाले की, गळीत हंगामासाठी लागणारी सर्व ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणांचे करार पूर्ण करुन त्यांना अॅडव्हान्स वाटप करण्यात आला आहे. या गाळपासाठी लागणाऱ्या ऊसाच्या नोंदी झाल्या आहेत. भागातील जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी ऊसाच्या नोंदी देऊन सहकार्य करावे. महादेव पाटील, सिताराम शुगरचे जनरल मॅनेजर हनुमंत पाटील, संचालक युवराज सूर्यवंशी, चिफ इंजि. रोंगे, इलेक्ट्रिक इंजि. अमित गाजरे, कायदा सल्लागार अॅड. शैलेश हावनाळे, धनश्री महिला पतसंस्थेच्या मॅनेजर सुनीता सावंत, संदीप सूर्यवंशी, धनश्री मल्टिस्टेटचे मॅनेजर रमेश फडतरे, महेश दत्तू, बबन पाटील, सिताराम अर्बनचे संचालक संजय चौगुले, ऊस पुरवठा अधिकारी सुधाकर देशमुख, आष्टी यूनिटचे जनरल मॅनेजर भागवत मगर, चीफ केमिस्ट विजय यादव, चिफ इंजि. आप्पा मासाळ, तानाजी कदम, समाधान फरतडे आदी उपस्थित होते. कारखान्याचे जनरल मॅनेजर भागवत मगरे यांनी प्रास्ताविक केले. मुख्य शेतकी अधिकारी तानाजी कदम यांनी आभार मानले.