ब्राझील: CLI टर्मिनलच्या अंदाजानुसार धान्य, साखरेच्या शिपमेंटमध्ये 15% झाली वाढ

सँटोस : ब्राझीलमधील सर्वात मोठ्या कृषी वस्तू निर्यात टर्मिनलपैकी एक लॉजिस्टिक कंपनी CLI  ने दावा केला आहे कि, व्यापारी आणि मिलर्सकडून वाढलेल्या मागणीमुळे 2024 मध्ये सुमारे 15% अधिक धान्य आणि साखर पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे. CLI कंपनीचे संचालक (ऑपरेशन्स) लुईस नेव्हस यांच्या मते,  या वर्षी साखरेची शिपमेंट 1 दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक वाढून 9.5 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर धान्य लोडिंग 1 दशलक्ष टनांनी वाढून 6.5 दशलक्ष टनांपर्यंत पोहचेल.

CLI कंपनीने फेब्रुवारीमध्ये 1.3 दशलक्ष टन मासिक लोडिंगचे रेकॉर्ड नोंदवले. नेव्हस म्हणाले, त्यापैकी साखरेचे प्रमाण 900,000 टन होते. CLI हे ब्राझीलचे सर्वात मोठे साखर निर्यात टर्मिनल आहे, जे देशाच्या एकूण साखर निर्यातीपैकी एक तृतीयांश हाताळते. हे टर्मिनल मॅक्वेरी ॲसेट आणि खाजगी इक्विटी फर्म IG4, द्वारे नियंत्रित केले जाते.

2023 मध्ये उसाच्या भरघोस उत्पादनामुळे ब्राझीलने सुमारे 31 दशलक्ष टन साखरेची विक्रमी निर्यात केली. बहुतेक विश्लेषकांना 2024 मध्ये तेवढीच साखर निर्यात होईल, अशी अपेक्षा आहे. नेव्हस म्हणाले की, मुळात 2024 साठी CLI ची सर्व लोडिंग क्षमता आधीच बुक केली गेली आहे. CLI ने सँटोस बंदरातील टर्मिनलचा विस्तार करण्यासाठी 600 दशलक्ष रियास ($119.51 दशलक्ष) ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे, ज्याचे काम 2025 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here