ब्राझील : जानेवारीत इथेनॉल विक्रीत ३२ टक्क्यांची घसरण

ब्राझीलिया : ब्राझीलमध्ये जानेवारी महिन्यात इथेनॉलची विक्री ३२ टक्क्यांनी घसरली आहे असे युनिका उद्योग समुहाने आपल्या अहवालात म्हटले आहे. जानेवारी महिन्यात एकूण विक्री १.७६ बिलियन लिटर झाली आहे. एप्रिल २०२१ नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक घसरण झाली आहे. गॅसोलीनशी स्पर्धा करताना हायड्रोस इथेनॉलची विक्री ४४ टक्क्यांनी घटून ९१८ मिलियन लिटर झाली आहे.

आंतराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमती वाढीनंतरही मोटार मालकांना गॅसोलीनचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. ब्राझीलच्या कारखान्यांनी उच्च परतावा लक्षात ठेवून ऊसाचा वापर इथेनॉलऐवजी साखर उत्पादनासाठी केला आहे. त्यामुळे जैव इंधनाचा पुरवठा कमी झाला आहे. तसेच किमती वाढल्या आहेत. युनिकाने सांगितले की, इथेनॉलच्या कमी मागणीचे कारण इंधनाच्या अधिक किमती होत्या. त्यामुळे चालकांनी आपला प्रवास कमी केला आहे. ब्राझीलमध्ये नव्या पिकाची तोडणी मार्चच्या अखेरीस अथवा एप्रिलच्या सुरुवातील होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here