ब्राझील आणि भारत ऊर्जा क्षेत्राच्या विकासावर भर देणार

नवी दिल्ली : ब्राझीलचे खाण आणि ऊर्जा मँत्री अलेक्झॅँडर सिल्विरा या वर्ष अखेरपर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे. सिल्वीरा हे भारतासोबत ऊर्जा संबंधी क्षेत्रात प्राधान्यक्रम देतील, खास करून जैव इंधन आणि इथेनॉल उत्पादन क्षेत्रावर अधिक फोकस राहिल अशी अपेक्षा आहे. भारताने २०२५ पर्यंत इंधानमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ब्राझील इथेनॉल मिश्रीत इंधनाच्या जगतात सर्वात उन्नत उत्पादकांपैकी एक आहे आणि यावर भारतासोबत सहयोग वाढविण्याची इच्छा दर्शवित आहे.

लाईव्ह मिंटमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतामध्ये ब्राझीलचे माजी राजदूत आंद्रे अरन्हा डी लागो यांनी एका मुलाखतीत म्हटले की, मला असे वाटते, २०२५ पर्यंत इथेनॉल मिश्रण २० टक्क्यांच्या उद्दिष्टापर्यंत आणताना भारताने इथेनॉलसाठी एक मोठी बाजारपेठ तयार केली आहे. याशिवाय, भारत आधीपासूनच जगाील कार्सचा सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. पुढील टप्प्यात दोन्ही पक्षांकडून ज्ञान आणि अनुभवांचे आदान-प्रदान अपेक्षित आहे. जर भारत आणि ब्राझील या दोघांनीही या इथेनॉल योजनेत स्वतःचा समावेश केला तर आम्ही जागतिक स्तरावर इथेनॉलची मोठी बाजारपेठ पाहू शकतो. कारण, भारत आणि ब्राझील हे दोन्ही महत्त्वपूर्ण बाजार आहेत. ते इतर देशांना याचा हिस्सा बनण्यास तयार करू शकतात.

ब्राझील एक प्रमुख तेल उत्पादकाच्या रुपात समोर येत आहे आणि आगामी वर्षांमध्ये तेलाचा पाचवा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार बनण्याची अपेक्षा आहे. अलिकडील वर्षात भारताने ब्राझीलकडे मोर्चा वळवला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये IOCL ने OPEC पुरवठादारांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी ब्राझीलच्या तेल प्रमुख पेट्रोबाससोबत एक दिर्घकालीन कच्च्या तेलाचा सौदा केला आहे. भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस सचिव पंकज जैन यांनी ब्राझील दौरा केला होता. तेव्हा पेट्रोब्राससोबत १.७ मिलियन मेट्रिक टन प्रती वर्ष करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्याच महिन्यात भात पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनेसुद्धा पेट्रोब्राससोबत एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.

डी लागो यांनी म्हटले आहे की, भारत अशा विचारांना स्वीकारणारा पहिला देश आहे की, ब्राझील तेल जगतात एक मुख्य खेळाडू आहे. ब्राझील या उद्योगात नवा आहे, त्यासाठी भारत आमच्यासोबत घनिष्ठ संबंध ठेवून असणे हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण, तो तेलाचा प्रमुख वापरकर्ता देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here