संपूर्ण जगभरात साखरेच्या किमंतीत होणार्या घसरणीमुळे साखर कारखाने जिवंत राहण्यासाठी संघर्ष करीत आहेत. साखरेचा अतिरिक्त साठा, किंमतीत होणारी घट यामुळे बरेच साखर कारखाने नाईलाजाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या परिस्थितीतीचा ब्राझीलमधील रायझेन या साखर कारखान्यावरही मोठा परिणाम झाला आहे.
साखर आणि इथेनॉल चे प्रमुख उत्पादक असणारी रायजेन कंपनी, साओ पाउलो या ठिकाणच्या आपल्या बोन रेटिरो कारखान्याला बंद करणार आहे. अर्थात, कारखाना बंद होतोय ही घटना पहिलीच नाही, यापूर्वीही दुष्काळानंतर ऊसाच्या कमी अनुउपलब्धतेमुळे 2015 मध्ये कारखाना बंद पडला होता, आणि 2017 मध्ये पुन्हा सुरुही झाला होता.
कारखान्यातील कर्मचार्यांना इतर काम देण्यात येईल, असे सांगितल्यामुळे कारखान्यातील कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे. आर्थिक मंदीमुळे ऑगस्ट महिन्यात फ्रान्स साखर कारखाना टेरोस कमोडिटीज ने 2020 पर्यंत केनिया आणि दक्षिण आफ्रीकेमध्ये परिचालन आणि साखर व्यापार बंद करण्याची घोषणा केली होती.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.