साओ पाउलो : एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या २०२३-२४ या हंगामामध्ये ब्राझील सहा बिलियन लिटर मक्क्यावर आधारित इथेनॉलचे उत्पादन करेल. गेल्या हंगामाच्या तुलनेत हे उत्पादन ३६.७ टक्के जादा असेल.
याबाबत उपलब्ध डेटानुसार, कोविड महामारी आणि प्रतिस्पर्धेदरम्यान, आर्थिक मंदीच्या स्थितीतही ब्राझीलच्या मक्क्यावर आधारित इथेनॉल उत्पादनात वाढ झाली आहे. आणि याचा आगामी काळात विस्तार सुरू राहिल. कारण, स्वच्छ इंधनाच्या पर्यायांची मागणी सतत वाढत आहे. पुढील हंगामात देशातील इथेनॉलच्या खपामध्ये मक्क्यापासून उत्पादित इथेनॉलचा हिस्सा १९ टक्के असेल अशी अपेक्षा आहे. सध्याच्या हंगामात हा हिस्सा १३.७ टक्के इतका आहे. चालू महिन्यात संपणाऱ्या सध्याच्या पिक हंगामात ऊसापासून इथेनॉल उत्पादन २७ बिलियन लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.