साओ पाउलो: जगात अमेरिकेनंतर सर्वात जास्त कोरोनाचा परिणाम ब्राझील वर झाला आहे. इथे कोरोनाग्रस्त दिवसेंदिवस वाढतच आहेत. आता कोरोना ने ऊस श्रमिकांनाही सोडलेले नाही. ब्राझीलच्या साओ पाउलो राज्यातील कैपिवेरिएशन नगरपालिका क्षेत्रातील शुगर कंपनी रायज़ेन मधील एकूण 53 ऊस श्रमिक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. शहराच्या आरोग्य विभागाने सांगितले की, कोरोनाग्रस्त श्रमिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते, जेणेकरून आरोग्य कार्यकर्त्यांना आजाराच्या प्रसारापासून वाचवले जाऊ शकेल.
स्थानिक सरकारच्या नुसार, सर्व श्रमिक जे कोरोनाग्रस्त आढळले आहेत, त्यांची दिवसातून दोन वेळा आरोग्याची तपासणी केली जात आहे. रायजेन व्यवस्थापकाने सांगितले की, हे श्रमिक कारखान्याची सेवा करणाऱ्या ग्रामीण श्रमिक संघाचा एक भाग आहेत. त्यांनी सांगितले की, ते श्रमिकांच्या आरोग्याबाबत सातत्याने अपडेट राहात आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.