साओ पाउलो : ब्राझीलमधील रिओ ग्रांडे डो सूल राज्यातील दुष्काळामुळे मक्क्याच्या शेतांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता पिकाचे उत्पादन ४.५१ मिलियन टनापर्यंत होईल, अशी अपेक्षा असल्याचे अनुमान स्टोनएक्स (StoneX) ने वर्तविले आहे.
उत्पादनाची सुधारित आकडेवारी ५.३८ मिलियन टन या आपल्या पूर्वीच्या अनुमानापेक्षा कमी आहे, असे स्टोनएक्सने स्पष्ट केले. याबाबत StoneX ने म्हटले आहे की, रियो ग्रांडे डो सुल भागाला प्रतिकूल हवामानाचा त्रास होणे ही असामान्य बाब नाही. सध्याच्या कोरड्या हवामानाचा राज्यातील सोयाबीन पिकावरही परिणाम होईल की नाही हे आताच सांगणे खूप घाईचे ठरेल. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये शेतातील पिकाच्या विकसन अवस्थेतून ते स्पष्ट होईल, असे स्टोनएक्सने म्हटले आहे.