कोरोनाचा फैलाव देशात वाढतच आहे. याचा सर्वात मोठा परिणाम अमेरिका आणि साखर उत्पादक देशांपैकी ब्राजील वरही झाला आहे. ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 11,687 कोरोना बाधित आढळले आहेत, ज्यामुळे देशामध्ये आता बाधितांची संख्या एकूण 3,74,898 वर पोचली आहे.
लॅटिन अमेरिकी देशाने गेल्या 24 तासामध्ये 807 मृत्यूंची नोंद केली आहे. याबरोबरच मरणार्यांची संख्या 23,473 इतकी झाली आहें. संयुक्त राज्य अमेरिकेनंतर कोरोनामुळे आता ब्राजील सर्वात अधिक प्रभावित देश आहे.
कोरोनामुळे देशातील इथेनॉल आणि साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. इथेनॉल उद्योगाचे नुकसान झाल्यामुळे देशातील कारखाने आता साखर उत्पादनावर लक्ष केंद्रीत करत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.