ब्रासिलिया : हायड्रोस इथेनॉल उत्पादक आणि आयातदारांना आता गॅस स्टेशनवर थेट ग्राहकांना जैव इंधन विक्री करता येणार आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी नुकतीच यासंदर्भातील एका अस्थायी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. जैव इंधन क्षेत्रात निकोप स्पर्धा वाढविण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.
याबाबत रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, या आदेशामध्ये ब्रँडेड गॅस स्टेशनवरही इतर पुरवठादारांकडून इंधन विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये ग्राहकांना उत्पादनाच्या निर्मितीबाबत माहिती देण्याची अट ठेवण्यात आली आहे. इंधन क्षेत्रात निकोप स्पर्धा वाढविण्याचा उद्देश या धोरणामध्ये आहे. याबाबत ऊर्जा मंत्रालयातने दिलेल्या माहितीनुसार, हा अस्थायी आदेश डिसेंबर महिन्यापासून लागू होणार आहे. या आदेशावरून कायदा तयार करण्यासाठी १२० दिवसांत मंजुरीची प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link