हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : चीनमंडी
ब्राझीलला अपेक्षित आहे की चीनी सरकार साखरवर काही आयात शुल्क नूतनीकरण करणार नाही अशी ब्राझीलच्या कृषी मंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. या संदर्भात ब्राझीलचे व्यापार खात्याचे सचिव ओर्लेंडो लायटी रिबैरो म्हणाले, ‘आयात शुल्कासंदर्भात अद्याप अजून कोणतिही स्पष्टता झालेली नाही. याचा माहिती विदेश मंत्रालयाला दिली जाईल. जिनिव्हामध्ये जागतिक व्यापार संघटनेते ब्राझील आणि चीनच्या शिष्टमंडळामध्ये साखरेच्या आयात शुल्काबाबत चर्चा झाली आहे आणि त्याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. चीनकडून आयात शुल्क नूतनीकरण होणार नाही अशी अपेक्षा त्यानी व्क्यत केली.
चीनने २०१७ मध्ये १.९४ मिलियन टन कोट्याच्या पुढील साखरेवर अतिरिक्त ४५ टक्के आयात शुल्क लावले होते. चीनमधील स्थानिक बाजारपेठेतील साखर उद्योगाला वाचवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. सध्याच्या कोट्याबाहेरील साखरेवर ५० टक्के आयात शुल्क आहे. त्यात नव्याने ४५ टक्क्यांची भर पडल्याने आयात शुल्क ९५ टक्क्यांवर गेले. त्याचा परिणाम ब्राझीलमधून चीनला होत असलेल्या निर्यातीवर झाला. मे २०१८ मध्ये ब्राझीलची चीनला कोट्या पलिकडे होणारी साखर निर्याय ९० टक्क्यांनी कमी झाली तर, या महिन्यात ती ८५ टक्क्यांनी कमी झाली. चीन सरकारने सुरुवातीला भारताकडून साखर आयात करण्याची तयारी केली होती. त्यांच्या शिष्टमंडळाने भारतातील साखर कारखान्यांना भेटी ही दिल्या होत्या. पण, चीनने साखर आयातीसाठी पाकिस्तानशी करार केल्यामुळे भारत आणि ब्राझीलला चीनच्या मोठ्या बाजारपेठेपासून मुकावे लागले आहे.