साओ पाउलो : ब्राझीलमध्ये देशाच्या मध्य-दक्षिण विभागातील साखर कारखाने मार्चच्या दुसऱ्या उत्तरार्धात जवळपास ५ मिलियन टन ऊसाचे गाळप करतील, जे गेल्या २०२२ मधील समान कालावधीच्या तुलनेत जवळपास ५ पट अधिक आहे, असे अनुमान ब्राझीलियन साखर समूह UNICA ने शुक्रवारी व्यक्त केले आहे. UNICA च्या अनुमानामुळे नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून ते आत्तापर्यंत पिकाच्या काळात अनुकूल हवामानानंतर ब्राझीलचा साखर हंगाम लवकर सुरू होण्याच्या मागणीला दुजोरा देत आहे. ब्राझीलच्या मध्य-दक्षिण प्रदेशात २०२३/२४ मध्ये विक्रमी ऊस तोडणी होईल, अशी शक्यता आहे.
ब्राझीलचा साखर हंगाम अधिकृतरित्या एप्रिल महिन्यात सुरू होतो. UNICA ने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात २४ कारखाने आधीच सुरू होते. त्यांनी गेल्या वर्षीच्या १,४२,००० टनाच्या तुलनेत ६,०८,००० टन ऊसाचे गाळप केले. UNICA ने म्हटले आहे की, मार्चच्या उत्तरार्धात ३६ आणखी कारखाने सुरू झाले आहेत अथवा सुरू केले जातील, त्यामुळे एक वर्षापूर्वीच्या समान कालावधीमधील २५ च्या तुलनेत गाळप करणाऱ्या एकूण कारखान्यांची संख्या ६० झाली आहे.