ब्रासिलिया : ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो कोरोनाग्रस्त झाले आहेत. ते म्हणाले, त्यामध्ये कोरोनाची हलकी लक्षणे आहेत आणि त्यांना याबाबत अडचण नाही. बोल्सोनारो म्हणाले, मी ठीक आहे. माझी तब्येत सामान्य आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच माझे वावरणे राहील.
ब्राझील जगभरात कोरोना वायरसच्या प्रभावित देशामंध्ये अमेरीकेनंतर दुसर्या स्थानावर आहे. इथे जवळपास 16 लाख पेक्षा अधिक लोक कोरोना संक्रमित आहेत. यामध्ये 65 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
जेयर बोल्सोनारोच्या सरकारवर कोरोना बाबत सावधानतेचे पाऊल न उठवण्याचे आरोप झाले आहेत. सुरुवातींच्या दिवसात बोल्सोनारे यांनी कोरोना वायरसला सामान्य फ्ल्यू असल्याचे सांगितले होते.
ते म्हणाले होते की, जर मी कोरोनाग्रस्त झालो तर या साध्या फ्लू मुळे हार मानणार नाही.
राष्ट्रपतीयांनी 11 मार्च ला सांगितले होते, मला आतापर्यंत इतके समजले आहे की, कोरोना वायरसऐवजी अनेक प्रकारचे दुसरे फ्ल्यू आहेत, ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.