ब्राझीलमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला २.५७ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन : UNICA

साओ पाउलो : ब्राझीलमध्ये मे महिन्याच्या पहिल्या सहामाहीत मध्य-दक्षिण उसाचे गाळप एकूण ४४.७५ दशलक्ष मेट्रिक टन झाले आहे. एक वर्षापूर्वीच्या तुलनेत हे उत्पादन ०.४३ % अधिक आहे, अशी आकडेवारी शुक्रवारी UNICA उद्योग समूहाने जारी केली आहे. या कालावधीत साखरेचे उत्पादन २.५७ दशलक्ष टन झाले, जे गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.९७ % जास्त आहे, तर इथेनॉलचे उत्पादन २.१४ टक्क्यांनी वाढून १.९९ अब्ज लिटर झाले आहे, असे UNICA च्या अहवालात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here