साओ पाउलो : ब्राझीलची ऊर्जा कंपनी रायझेन एनर्जी (Raizen Energia SA) आपल्या व्यावसायिक युनिटमध्ये विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्गुंतवणुकी (divestment) च्या संधी आणि धोरणात्मक भागीदारीबाबत विचार करीत आहे. Raizen चे सीईओ रिकार्डो मुसा यांनी गुंतवणूकदारांसोबतच्या एका बैठकीत सांगितले की, कंपनीकडे अनेक अॅसेट्स आहेत, त्यांची विक्री अथवा भागीदारीच्या माध्यमातून कमाई करणे शक्य आहे.
मुसा यांनी सांगितले की, या “पोर्टफोलियो रिसायकलींग” योजनेसाठी कोणतेही विशिष्ट लक्ष्य निर्धारीत करण्यात आलेले नाही. कंपनीच्या दीर्घकालीन धोरणावर परिणाम होवू न देता खूप विचारपूर्वक सौदा केला जाईल. साखरेशी संबंधीत बाबींची माहिती देताना मुसा म्हणाले की, आम्ही साखरेमध्ये आणखी गुंतवणूक करण्याचा निर्णय तेव्हाच घेऊ, जेव्हा साखरेच्या किमती या २२ अथवा २३ सेंट प्रती पाऊंडच्या वर असतील.