ब्रासिलिया : ब्राझील सरकारने २०२२ च्या अखेरपर्यंत इथेनॉल आणि सहा खाद्य उत्पादनांवरील आयात शुल्क शून्यावर आणले आहे. सोमवारी याबाबत अधिकृत सुत्रांनी घोषणा केली. याबाबत अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कम्प्युटर, दूरसंचार उत्पादने आणि भांडवली वस्तूंवरील करात कायमस्वरुपी १० टक्क्यांची कपात केली जाणार आहे.
या उपाययोजनेसाठी सरकारला साधारणतः १ अब्ज रियास (1 billion reais) खर्च येणार आहे. ज्या खाद्य पदार्थांवर, उत्पादनांवर आयात करात कपात केली जाणार आहे, त्यामध्ये कॉफी, मार्जरीन, पनीर, पास्ता, साखर आणि सोयाबीन तेल यांचा समावेश आहे.
Home Marathi International Sugar News in Marathi ब्राझीलकडून २०२२च्या अखेरपर्यंत इथेनॉल आयात शुल्क रद्द